23.5 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home राष्ट्रीय देश पीएफवरील व्याज दरात कपात

पीएफवरील व्याज दरात कपात

0
17

नवी दिल्ली, दि. 19 – कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) 2016-17 वर्षासाठी भविष्य निधी ठेवींवर 8.65 टक्के व्याज जाहीर केला आहे. बंगळुरुमध्ये झालेल्या सीबीटीच्या (केंद्रीय विश्वस्त मंडळ) बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. कर्मचारी वर्गासाठी नक्कीच हा तोट्याचा निर्णय आहे, कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत हा व्याजदर कमी आहे. 2015-16 वर्षासाठी पीएफवरील व्याजदर 8.8 टक्के इतका होता. ईपीएफओच्या शेअरहोल्डर्सची संख्या 4 कोटींहून अधिक असून या निर्णयामुळे कर्मचारी वर्ग प्रभावित होणार आहे.

यापूर्वी अर्थमंत्रालयाने 2015-16 या आर्थिक वर्षसाठी ईपीएफवरील व्याज दर कमी केला होता. संबंधित व्याजदर 8.7 टक्के करण्यात आला होता. मात्र, यावेळी कामगार मंत्र्यांच्या नेतृत्त्वातील केंद्रीय विश्वस्त मंडळाने 8.8 टक्के व्याजाला मंजुरी दिली होती. ट्रेड युनियनच्या विरोधानंतर केंद्र सरकारने आपला निर्णय मागे घेतला होता आणि शेअरहोल्डर्सना 8.8 टक्के व्याज देण्यास सहमती दर्शवली

blank