23.9 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ मंगळवारला हागणदारीमुक्त गोंदियासाठी संकल्प मेळावा

मंगळवारला हागणदारीमुक्त गोंदियासाठी संकल्प मेळावा

0
14

गोंदिया,दि.१९ : जिल्हा परिषद गोंदियाच्या वतीने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमाअंतर्गत मार्च २०१७ पर्यंत संपूर्ण गोंदिया जिल्हा हागणदारीमुक्त करावयाचा आहे. त्यासाठी आज २० डिसेंबर रोजी हागणदारीमुक्त गोंदिया जिल्हा संकल्प मेळाव्याचे आयोजन सकाळी ११ वाजता कटंगीकला येथील मयूर लॉन येथे करण्यात आले आहे.
संकल्प मेळाव्याचे उदघाटन पालकमंत्री राजकुमार बडोले हे करतील. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे हया असतील. यावेळी खासदार सर्वश्री प्रफुल पटेल, नाना पटोले, अशोक नेते, आमदार सर्वश्री नागो गाणार, प्रा.अनिल सोले, डॉ.परिणय फुके, गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, कृषी व पशूसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, महिला व बालकल्याण समिती सभापती विमल नागपूरे, समाज कल्याण समिती सभापती देवराज वडगाये, कटंगीकला सरपंच कांता नागरीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. असे जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख यांनी कळविले आहे.