स्वप्नपूर्ति बहुउद्देशीय संस्था लाखनी तर्फे वक्तृत्व स्पर्धा

0
13

लाखनी,दि.10 – स्वप्नपूर्ती बहुउद्देशीय संस्था लाखनीच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती निमित्त “राष्टीय युवक दिन” च्या औचित्यसाधून तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा स्थानिक संत तुकाराम सभागृह, केसलवाडा रोड, लाखनी येथे 12 जानेवारीला दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये दोन गट असून गट “अ” मध्ये इयत्ता ५ वी ते ७ वी असून “स्वामी विवेकानंद: विद्यार्थ्यांचे आदर्श” हा विषय तर गट “ब” मध्ये इयत्ता ८ वी ते १२ वी असून “स्वामी विवेकानंद: युवकांसाठी प्रेरणास्त्रोत” हा विषय ठेवण्यात आला आहे. दोन्ही गटामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी रोख पारितोषिक़ासह आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकाने पूर्वनोंदणी करावी आणि स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत शाळेने एक शिक्षक प्रतिनिधी पाठवावे असे आवाहन स्वप्नपूर्ती संस्थेच्या वतीने अध्यक्ष प्रशांत वाघाये, सचिव सुधीर काळे, उपाध्यक्ष प्राची बेदरकर, सहसचिव नीलेश राऊत, स्पर्धा संयोजक आशीष राऊत, आशीष बडगे, सदस्य नितेश टिचकुले, लक्ष्मण बावणकुळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी प्रशांत वाघाये मो.8275397380, लक्ष्मण बावनकुळे मो.7875578762 किंवा आकृती कंप्यूटर्स लाखनी, निट्स कंप्यूसिस लाखनी येथे संपर्क साधावे असेही म्हटले आहे.