आरोपांनंतर मेघालयच्या राज्यपालांचा राजीनामा

0
10

शिल्लॉंग,वृत्तसंस्था दि. 27- मेघालयचे राज्यपाल व्ही. शनमुगनाथन यांनी गुरूवारी रात्री राजीनामा दिला. राजभवनमध्ये काम करणा-या अनेक कर्मचा-यांनी पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रपती भवनात पत्र पाठवून त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. त्यांच्यावर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.”राज्यपालांमुळे राजभवनाची प्रतिष्ठा आणि कर्मचा-यांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. राजभवनाचं रूपांतर तरूणींच्या क्लबमध्ये झाले आहे ”असा गंभीर आरोप करत त्यांना तात्काळ हटवण्यात यावे अशी मागणी राजभवनातील जवळपास 100 कर्मचा-यांनी केली होती.
शनमुगनाथन यांच्या आरोपांबाबत पंतप्रधान मोदी आणि गृह मंत्रालयाच्या निर्णयाची वाटट पाहात आहे असं मेघालयचे मुख्यमंत्री मुकुल संगमा म्हणाले होते. मात्र, तीव्र होणारा विरोध पाहता शनमुगनाथन राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. काम मागायला आलेल्या एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यापुर्वी शनमुगनाथन यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले होते पण वाढत्या विरोधामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.