आयआयटी खरगपूर घडवणार पर्यावरण अभियंते

0
11

कलकत्ता- सध्या कोणताही उद्योग काढताना पर्यावरण विभागाची परवानगी लागते. बहुतांशी उद्योग हे पर्यावरण कायद्याच्या अडचणीत सापडले आहेत. उद्योगांची गरज लक्षात घेऊन आयआयटी, खरगपूरने पर्यावरण अभियंते घडवण्याचे ठरवले आहे.
येत्या २०१५ पासून आयआयटीतर्फे पर्यावरण विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम शिकून बी.टेक. व एम. टेकची पदवी घेण्यात येणार आहे.
सध्या उद्योगांना पर्यावरण अभियंत्याची मोठी गरज आहे. हा प्रकार केवळ कॉर्पोरेट सोशल रिस्पॉटबिलिटी म्हणून करणे योग्य नाही. पर्यावरणावर लक्ष दिल्यास कंपनीच्या खर्चात निश्चित बचत होऊ शकेल, असे आयआयटी खरगपूरचे प्राध्यापक जयंत भट्टाचार्य यांनी सांगितले.
खाण, रसायन, सिमेंट, अन्नप्रक्रिया, मेटलर्जी आदी क्षेत्रात पर्यावरणाचे अडथळे मोठय़ा प्रमाणावर निर्माण होत आहेत. संसाधनाचा प्रभावी वापर, कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण आदी समस्या सोडवणे गरजेचे आहे. आमचे तज्ज्ञ पर्यावरण अभियंते हे समस्या सोडवू शकतील, असेही भट्टाचार्य म्हणाले.
भारताला सध्या १० हजार पर्यावरण अभियंत्यांची गरज आहे. सध्या पर्यावरण अभियंते नसल्याने रसायन अभियंत्यांना हे काम करावे लागत आहे. येत्या दोन ते तीन वर्षानंतर आयआयटी खरगपूरतर्फे नियमित तत्त्वावर पर्यावरण अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. भारतातील उद्योगांची गरज लक्षात घेऊन देशात पहिल्यांदाच अभ्यासक्रम तयार केला आहे, असे त्यांनी सांगितले.