23.8 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home राष्ट्रीय देश पीडीपी नेत्याची गोळ्या घालून हत्या

पीडीपी नेत्याची गोळ्या घालून हत्या

0
19
नवी दिल्ली, दि. 24 – जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात पीडीपी नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान परिसरात पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीचे जिल्हाध्यक्ष अब्दुल गनी दार यांच्यावर संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केला. अब्दुल गनी दार श्रीनगरच्या दिशेने जात असताना हा गोळीबार करण्यात आला.या गोळीबारानंतर अब्दुल गनी दार यांना जवळच्याच एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.
अब्दुल गनी दार हे 1 नोव्हेंबर 2014 साली पीडीपीमध्ये प्रवेश करण्याआधी कॉंग्रेसमध्ये होते.