सुकमात पाच जवान जखमी,दंतेवाड्यात स्पोटके जप्त

0
9

रायपूर,दि.24(वृत्तसंस्था)-छत्तीसगड राज्यातील अतिसंवेदनशील असलेल्या दंतेवाडा जिल्ह्यातील जंगलव्याप्त भागात नक्षलवाद्यांनी पेरलेली १० किलो स्फोटके दंतेवाडा येथून पोलिसांनी जप्त केली आहेत.सोबतच  1 लाखांचे बक्षीस असणा-या नक्षलवाद्याला सुरक्षा दलांनी अटक केली आहे.तर दुसरीकडे सुकमा जिल्ह्यात आज नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे पाच जवान जखमी झाल्याची घटना घडली आहे.