शेतकऱ्यांचं मन वळविण्यासाठी मुख्यमंत्री चौहान यांचं उपोषण

0
5

भोपाळ, दि. 10- मध्य प्रदेशामध्ये कर्जमाफीच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. संतप्त शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे मध्य प्रदेश पूर्णपणे अशांत झालं आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन शांत करण्यासाठी तसंच शेतकऱ्यांची मनं वळविण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबिला आहे. शेतकऱ्यांशी थेट संवाज साधण्यासाठी त्यांनी भोपाळमध्ये उपोषण सुरू केलं आहे. जोपर्यंत राज्यामधील हिंसाचार थांबणार नाही तोपर्यत उपोषण सुरूच ठेवणार असा निर्धारही मुख्यमंत्री चौहान यांनी केला आहे.  चौहान हे भोपाळमधील दसरा मैदानात लोकांशी थेट संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपोषणात सहभागी होण्यासाठी भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते आणि मंत्री दसरा मैदानावर पोहोचले आहेत. मंचावर चौहान यांच्या पत्नी साधना सिंह, ज्येष्ठ नेते बाबूलाल गौर, प्रभात झा यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थितीत आहेत.