25.2 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home राष्ट्रीय देश मोदी, शहांसह अडवाणींच्या उपस्थितीत कोविंद यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मोदी, शहांसह अडवाणींच्या उपस्थितीत कोविंद यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
22
नवी दिल्ली,दि.23(वृत्तसंस्था)- एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि सुषमा स्वराज हे उपस्थित होते.कोविंद यांच्या उमेदवारीसाठी भाजपने चार सेट तयार केले होते. यातील एका अर्जाचे सूचक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह हे आहेत. दुसऱ्या सेटवर सूचक म्हणून अमित शाह आणि अरुण जेटली  यांचे नाव आहे. तिसऱ्या सेटवर सूचक म्हणून अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल आणि व्यंकय्या नायडू यांचे नाव आहे. चौथ्या सेटवर सूचक म्हणून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि सुषमा स्वराज यांचे नाव आहे.