दिल्लीत ७० जागा लढविणार बसप

0
5
वाढदिवसाच्या शुभेच्छा

लखनऊ : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्ष सर्व ७० जागा लढणार असल्याची घोषणा पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केली असून निवडणुकीच्या प्रचारालाही प्रारंभ केला आहे.

सर्व ७० जागांवर बसपा या निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार असून पक्षाचा प्रचारही सुरू झाला आहे, असे मायावती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मायावती यांनी आपला ५९ वा वाढदिवस जनकल्याणदिन म्हणून साजरा केला. लोकसभा निवडणुकीत अच्छे दिन आणण्याचे स्वप्न दाखवून भाजपने जनतेची दिशाभूल केली. मात्र आता भाजप व केंद्र सरकार दिल्लीतील जनतेची दिशाभूल करू शकणार नाही, असेही मायावती यांनी सांगितले.
आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावरही या वेळी बोलताना मायावती यांनी खरपूस टीका केली. दलित व मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या बाबतीत केजरीवाल एक पाऊल पुढे गेले आणि आरक्षणच संपुष्टात आणण्यासंबंधीची विधाने त्यांनी केली व त्यांचे मतही असेच असल्याचे मायावती म्हणाल्या.