मुंबई : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार करत असून याबाबत थोड्याच दिवसांमध्ये निर्णय होईल, अशी माहिती दिली आहे. अद्याप कोणासोबतही दिल्ली निवडणुकीत युतीबाबत चर्चा झालेली नाही. येथील निवडणुकीस शिवसेना तोडीस तोड उमेदवार देणार असल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दिल्ली विधानसभेच्या फेरनिवडणुकींचे मतदान येत्या सात फेब्रुवारीला होणार असून १० फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्लीमध्ये मुख्य लढत ही आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस यांच्यात आहे. मात्र आता शिवसेनेही दिल्ली निवडणुकीसाठी दंड थोपाटले आहेत.