गोंदिया,दि.१९ :- देशभरात महिलांच्या विरोधात गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये 48 खासदार आणि आमदार आरोपी आहेत. त्यात 45 आमदार आणि 3 खासदार आहेत. ही माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआए) आणि नॅशनल इलेक्शन वॉचच्या रिपोर्टमध्ये समोर आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक 12 आमदार-खासदारांविरोधात महिलांच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरणे दाखल आहेत. पक्षाचा विचार करता भाजपचे सर्वाधिक 12 नेते आहेत. त्यानंतर शिवसेना (7) आणि नंतर टीएमसी (6) चा क्रमांक लागतो. काँग्रेसच्या 4 आमदार आणि खासदारांच्या विरोधात अशी प्रकरणे आहेत.
1580 आमदार-खासदारांविरोधात गुन्हेगारी प्रकरणे
– एडीआर आणि नॅशनल इलेक्शन वॉचने 4896 विद्यमान खासदार आणि आमदारांच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रांपैकी जवळपास 4845 प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करून ही माहिती मिळवली. – रिपोर्टनुसार 4845 आमदार, खासदारांपैकी 1580 विरोधीत गुन्हेगारी प्रकरणे दाखल आहेत. त्यापैकी 48 जणांवरील प्रकरणे महिलांशी संबंधित गुन्हेगारी खटले आहेत.
कोणत्या राज्यात किती खासदार/आमदारांवर महिला विरोधी गुन्हे
राज्य | खासदार/आमदार |
महाराष्ट्र | 12 |
पश्चिम बंगाल | 11 |
आंध्रप्रदेश | 05 |
ओडिशा | 05 |
झारखंड | 03 |
उत्तराखंड | 03 |
बिहार | 02 |
तमिळनाडू | 02 |
गुजरात | 01 |
कर्नाटक | 01 |
मध्य प्रदेश | 01 |
उत्तर प्रदेश | 01 |
केरळ | 01 |
एकूण | 48 |
कोणत्या पक्षाच्या किती आमदार-खासदारांविरोधात महिलांशी संबंधित गुन्हेगारी प्रकरणे
पक्ष | आमदार/खासदार |
भाजप | 12 |
शिवसेना | 07 |
टीएमसी | 06 |
टीडीपी | 05 |
काँग्रेस | 04 |
बीजेडी | 04 |
अपक्ष | 03 |
जेएमएम | 02 |
आरजेडी | 02 |
डीएमके | 02 |
माकप | 01 |
एकूण | 48 |
5 वर्षात कोणत्या पक्षाने अशा किती उमेदवारांना तिकिट दिले.
पक्ष | आमदार/खासदार |
भाजप | 47 |
बसप | 35 |
काँग्रेस | 24 |
शिवसेना | 22 |
सपा | 17 |
टीएमसी | 12 |
माकप | 12 |
माकप | 10 |
आप | 2 |
अपक्ष | 118 |
इतर | 148 |
एकूण | 447 |