मुलायमसिंहांच्या नातवाच्या टिळ्यास मोदींची हजेरी

0
9

लखनौ/सैफई- समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांचा नातू तेजप्रताप यादव यांच्या लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजकारणातील अनेक दिग्गज सैफईला आले आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्या मुलीसोबत मुलायमसिंह यादव यांच्या नातवाचे लग्न होत आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत बॉलिवूडमधील अनेक स्टार्स आले आहेत. दरम्यान, मोदींच्या सुरक्षेमुळे विमान लॅंड करायची परवानगी न मिळाल्याने अमिताभ यांचे विमान लखनौला उतरवण्यात आले. तेथून ते हेलिकॉफ्टरने सैफईला आले.
लालू प्रसाद यादव, जनता दल युनायटेडचे अध्यक्ष शरद यादव, मध्ये प्रदेशचे गृहमंत्री बाबू लाल गौर शुक्रवारीच सैफईत दाखल झाले. लग्नाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, अभिनेता सलमान खान, उद्योगपती अनिल अंबानी, पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी, राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह, नेते अमरसिंह आदी उपस्थित राहणार आहेत.