नितीश कुमारांचे भूसंपादन विधेयकाविरोधात उपोषण

0
6

पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकाविरोधात २४ तासांच्या उपोषणावर गेले असून सकाळीच पक्षाच्या कार्यालयात दाखल झाल्यानंतर नितीश कुमार यांनी उपोषणास सुरुवात केली.

कुमार यांच्यासह जदयू(संयुक्त)चे अध्यक्ष वसिष्ठ नारायण सिंह, वरिष्ठ मंत्री विजय चौधरी, श्याम रजाक, राजीव रंजन सिंह लालन, जदयूचे खासदार अली अन्वर, हकबंस, गुलाम रसूल बल्यावी आणि पक्षाचे वरिष्ठ नेते संजय झाही या उपोषणात सामील झाले आहेत. या उपोषणादरम्यान पक्षाचे अध्यक्ष वसिष्ठ सिंह यांनी केलेल्या भाषणात मोदी सरकारवर या जोरदार टीका केली. भूसंपादन कायदा हा शेतक-यांच्या हिताविरोधी तर कॉर्पोरेटच्या हिताचा असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे जो पर्यंत हे कायदा रद्दबातल ठरवला जात नाही तोपर्यंत याविरोधात आंदोलन करत राहू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.