29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय आबांच्या तासगावात राष्ट्रवादीने केली घोषणा

आबांच्या तासगावात राष्ट्रवादीने केली घोषणा

0
26

blank

सांगली-राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. या मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांची उमेदवारी आज अधिकृत जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज तासगाव येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता बैठकीत ही घोषणा केली.
तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित करण्यासाठी कार्यकर्त्यांची ही बैठक तासगाव येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीस अजितदादा पवार यांच्यासह माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि जयंत पाटीलही उपस्थित होते. कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची मते जाणून घेतल्यानंतरच अजितदादांनी सुमन पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. आबांना श्रद्धांजली म्हणून सर्वच पक्षांनी उमेदवार उभा करू नये आणि निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

blank