काच फुटून नाल्यात पडले 14 प्रवाशी, 10 ठार

0
7

वृत्तसंस्था
बिलासपूर- छत्तीसगडमधील कोरबाजवळ सोमवारी सकाळी एक बस दुर्घटनेत 10 प्रवाशांचा मृत्यु झाला असून 36 जण जखमी झाले आहेत. बिलासपूर-अंबिकापूर राष्ट्रीय महामार्गावर मोरगा गावाजवळ ही दुर्घटना घडली. भरधाव बस नाल्याच्या पुलाच्या संरक्षक कठड्याला धडकली आणि रेलिंगवर अटकली. बस थांबताच समोरील काच फुटून 14 प्रवासी नाल्यात पडले. त्यापैकी 10 जणांचा जागेवरच मृत्यू झाला. पुलाची उंची जवळपास 17-18 फुट आहे.
चालकाच्या बेसावधगिरीमुळे ही‍ दुर्घटना झाल्याचे बोलले जात आहे. दुर्घटना झाली तेव्हा बस वेगात होती. बस पुलावर येताच चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस पुलाच्या संरक्षण कठड्याला धडकली. धडक इतकी भीषण होती की, बसची समोरिल काच फुटून 14 लोक नाल्यात फेकले गेले. दगडावर आपटले गेल्याने 10 प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतामध्ये दोन महिला आणि दोन मुलींचा समावेश आहे.विश्रामपूरहून कोरबा जाण्यासाठी ही बस सोमवारी सकाळी 10 वाजता निघाली होती. दुर्घटनेची माहिती म‍िळताच मोरगा पोलिस घटनास्थळ पोहोचले. जखमींना पोडी उपरोडा येथील रुग्णालयात दाखल कर्‍णयात आले आहे. बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. बस चालक आणि वाहक अद्याप फरार आहेत.

मृतांची नावे पुढील प्रमाणे…
शांतीबाई रतनसिंह गोंड (70)(रा.काटारोली ताराघाटी), बलीराम बुढऊ(36) रा.रामेश्वरम श्रीनगर (प्रेमनगर), अमलेश्वर बबईराम यादव(30) रा. चंदननगर, निर्मल खूंटे साहेबलाल(36) रा.गोढ़ी कोरबा, सुखलाल बलीराम(40) रा.रामेश्वरम श्रीनगर (प्रेमनगर), पुष्पा वसंत (30) वंजारे रा. खरसिया, रायगड, पार्वती हरिनाथ साहू (36), रा.कासानवापारा, चोटिया, कु.चंदा हरिनाथ साहू (7), रा.कासानवापारा, चोटिया, कु.मुस्कान हरिनाथ साहू (11), रा.कासानवापारा, चोटिया, महावीर प्रसाद (57), रा.कोटा, डिप्टी रेंजर, रतनपूर

दोन मुलीसह आईचा मृत्यू…
या दुर्घटनेत कासानवापारा येथील पार्वती हरिनाथ साहू या महिलेसह तिच्या दोन्ही मुलींचा (चंदा आणि मुस्कान) मृत्यू झाला आहे. मृत पार्वती यांचे पती हरिनाथ यांनी सांगतले की, या दुर्घटनेमुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्‍धवस्त झाले आहे.