पंतप्रधान 8 एप्रिलला करणार मुद्रा बॅंकेचे अनावरण

0
7

नवी दिल्ली – सूक्ष्म वित्त संस्थांसाठी पुनर्वित्तपुरवठा करण्यासाठी आणि आर्थिक समावेशन ध्येय पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 एप्रिल रोजी मुद्रा बॅंकेचे अनावरण करणार आहेत. मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात मुद्रा बॅंक (मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी) स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. सूक्ष्म व्यावसायिक क्षेत्रात येणार्‍या व्यावसायिकांना मदत करण्याचा बँकेचा मुख्य उद्देश आहे.

केंद्र सरकार लहान व्यावसायिक, बचत गट, लहान मायक्रो-फायनान्स कंपन्या, एनबीएफसी व ट्रस्ट यांसारख्या संस्थांना कमी व्याज दराने कर्ज पुरवठा करणार आहे. देशात सद्यस्थितीत 5 कोटीपेक्षा अधिक लहान व्यावसायिक असून ते पारंपारिक मार्गाने व्यवसाय करतात. त्यांना आता फायदा होणार आहे.

सूक्ष्म वित्त संस्था, बँकेतर वित्तीय संस्था, नाबार्ड, सिडबी, रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यांची वित्तीय सेवा सचिव हसमुख अडिया यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असून त्यात प्राथमिक विषयांवर चर्चा करण्यात आली. लवकरच बँकेची विस्तृत कार्यकक्षा आणि इतर गोष्टी निश्चित