श्रीमंतांनी अनुदानित एलपीजी घेऊ नये – पंतप्रधान

0
13

नवी दिल्ली-बाजारभावाने सिलिंडर घेण्याची क्षमता असलेल्या ग्राहकांनी सरकारी अनुदान स्वतःहून नाकारावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये केले. ‘ऊर्जा संगम’ परिषदेचे उदघाटन केल्यानंतर त्यांनी ऊर्जेचे महत्त्व आणि सरकारचा त्यावर होत असलेला खर्च यावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.
आतापर्यंत २.८० लाख ग्राहकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळे सरकारचे १०० कोटी रुपये वाचणार असून, त्याचा वापर गरीबांच्या उत्कर्षासाठी करता येईल असे मोदींनी सांगितले.घरगुती सिलिंडवरील अनुदान थेटपणे बॅंकेत जमा करण्याच्या निर्णयामुळे अनुदानवाटपामध्ये होत असलेला घोटाळा थांबला असल्याचे सांगून ते म्हणाले, सध्या २७ लाख ग्राहकांना पाईपच्या साह्याने गॅसपुरवठा केला जातो.