24.4 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home राष्ट्रीय देश मोदी 30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता घेणार पंतप्रधानपदाची शपथ

मोदी 30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता घेणार पंतप्रधानपदाची शपथ

0
28

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.26: लोकसभा निवडणुकीतील देदीप्यमान विजयानंतर नरेंद्र मोदी गुरुवारला 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा संपन्न होईल. यावेळी मंत्र्यांच्या शपथविधीदेखील पार पडेल. भाजपा आणि एनडीएच्या खासदारांनी त्यांचे नेते म्हणून एकमुखाने मोदींची निवड शनिवारला संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या बैठकीत करण्यात आली.त्यानंतर राष्ट्रपतीकडे सरकारस्थापनेचा दावा केला होता.या सोहळ्याला विदेशातील पाहुण्यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे.

blank