मुख्य निवडणुक आयुक्तपदी नसीम झैदी यांची नियुक्ती

0
6

वृत्तसंस्था
नवी दिल्ली-निवडणूक आयोगाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून डॉ. नसीम झैदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज गुरुवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ही घोषणा केली आहे. नसीन झैदी १९ एप्रिलपासून आपला पदभार स्वीकारणार आहेत.
‘एएनआय’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाचे विद्यमान मुख्य आयुक्त एच. एस. ब्रम्हा हे १९ एप्रिलला निवृत्त होत आहेत. त्यामुळे कायदा मंत्रालयाने नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली होती. शेवटी राष्ट्रपतींनी नसीम झैदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. झैदी यांच्या आयुक्तपदी निवड झाल्याने सरकारला आता निवडणूक आयोगाच्या तीन सदस्यीय समितीवर दोन सदस्यांची नियुक्ती करावी लागणार आहे.
१९७६ च्या आयएस बॅचचे अधिकारी असलेले झैदी यांनी नागरी वाहतूक मंत्रालयातही काम केले आहे. झैदी हे २०१७ पर्यंत आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळतील.