याकूब मेमनची फाशी कायम

0
6

नवी दिल्ली – १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख दोषी याकूब अब्दुल रझाक मेमनची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी कायम ठेवली.
फाशीच्या शिक्षेच्या निर्णयाबाबत पुर्नविचार केला जावा अशी याचिका मेमनने दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यामूर्ती ए.आर.दवे यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने मेमनची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे मेमनच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कमोर्तब झाले आहे. यापूर्वी राष्ट्रपतींनीही मेमनचा दयेचा अर्ज फेटाळून लावला होता.
मी गेल्या २० वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. जन्मठेपेच्या १४ वर्षांच्या शिक्षेपेक्षाही ही अधिक शिक्षा असल्याचे मेमनने दाखल केलेल्या याचिकेत म्हचटले होते.१२ मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात सुमारे २५० लोकांचा मृत्यू झाला होता. तर ७०० हून अधिक जण जखमी झाले होते.