मसरतच्या अटकेविरोधात काश्मीरमध्ये बंद

0
17

वृत्तसंस्था
श्रीनगर – फुटीरतावादी नेता मसरत आलम याच्या अटकेविरोधात आज (शनिवार) काश्मीर खोऱ्यात बंद पुकारण्यात आला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हुरियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी आयोजित केलेल्या सभेत त्याने पाकिस्तानचा झेंडा फडकावीत देशविरोधी घोषणा दिल्याने मससरतविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याच्याविरुद्ध सार्वजनिक सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याला कोणत्याही सुनावणीशिवाय दोन वर्षे कारागृहात ठेवण्यात येवू शकते.
मसरतच्या अटकेविरोधात शुक्रवारी अनेक ठिकाणी काश्मीर खोऱ्यात पोलिस आणि मसरत समर्थकांमध्ये चकमकी झाल्या. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्याला जम्मूतील कारागृहात ठेवले आहे. मसरतच्या अटकेविरोधात आज बंद पुकारण्यात आला आहे. श्रीनगरमधील सर्व व्यवहार बंद असून, दुकाने बंद आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.