कच्छ जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का

0
9

कच्छ दि. ९- गुजरातमधील कच्छ जिल्ह्याला शनिवारी सकाळी भूकंपाच सौम्य धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल इतकी होती.
सकाळी साडेसहाच्या सुमारासा कच्छ जिल्ह्याला भूकंपाचा सौम्य हादरा जाणवला. भचाऊ शहरापासून २२ किमी अंतरावर या भूकंपाचे केंद्र होते. या धक्क्यामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.
साडेसहा वाजता भूकंपाचा धक्का बसल्यानंतर काही वेळातच कच्छमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का जाणवला. ७.४७ च्या सुमारास २ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला.
या भूकंपाच्या धक्क्यामुळे उंच इमारतीतील नागरिकांनी तात्काळ मोकळ्या जागेत धाव घेतली. मात्र या भूकंपाच्या धक्क्यामुळे जिवित वा वित्तहानी झाली नसल्याचे अधिका-यांनी सांगितले.