27 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home राजकीय राष्ट्रवादीचे फरार आमदार रमेश कदम अखेर अटकेत

राष्ट्रवादीचे फरार आमदार रमेश कदम अखेर अटकेत

0
23

पुणे, दि. १७ -अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी फरार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांना सोमवारी पहाटे पुण्यातील ग्रँड ह्यात या पंचतारांकित हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईतील सीआयडीच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरु झालेल्या अण्णाभाऊ साठे महामंडळात कोट्यावधींचा घोटाळा झाला असून याप्रकरणी रमेश कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २० जुलैपासून पोलिसांचे पथक रमेश कदम यांच्या मागावर होते. अखेरीस सोमवारी पहाटे पुणे – नगर रोडवरील ग्रँड ह्यात हॉटेलमधून त्यांना अटक करण्यात आली.