मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सोडचिठ्ठि देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर राजकीय चर्चांणा उधान आले आहे. खडसे यांच्यानंतर भाजप समर्थक मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची शक्यात आहे.
आता मीराभाईंदरमधील अपक्ष आमदार गीता जैन आज शनिवारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्या भाईंदरच्या माजी महापौर आणि भाजपनेत्या आहेत. विधानसभा निवडणूकीत गीता यांचे विरोधक मानले जाणाऱ्या नरेंद्र मेहता यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली होती. नरेंद्र मेहता हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांचे जवळचे मानले जातात. त्यामुळे गीता यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यांनी मेहतांचा पराभव केला. आता राज्यातील राजकीय गणितं बदलली आहेत. त्यामुळे गीता जैन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.