39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home राजकीय भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी अविनाश पाल यांची निवड

भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी अविनाश पाल यांची निवड

0
356

blank

सावली,दि.04ः-भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदावर अविनाश पाल यांची निवड केली आहे.त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.पाल यांनी सावली तालुक्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, धर्मजागरण, शैक्षणिक,सामाजिक ,आरोग्य इत्यादी सेवेमधुन प्रथम कार्याला सुरुवात केले.भाजपा कडुन पंचायत समिती सदस्य म्हणून दोन वेळा पद भूषविले.कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक म्हणून सुद्धा काम केले. त्यांचे संघटनात्मक कार्य पाहून भारतीय जनता पार्टीने तालुकाध्यक्षही पद दिले.कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक म्हणून अतिशय उत्तम कामगिरी केली.अविनाश पाल यानी निवडीचे श्रेय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी मंञी हंसराजभैया अहिर,खासदार अशोक नेते, आमदार बंटीभाऊ भांगडिया,माजी मंत्री शोभाताई फडणवीस,माजी आमदार प्रा.अतुल देशकर,जि.प.अध्यक्ष संध्याताई गुरनुले,भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे प्रदेश कार्यकारिणी सदस्य हरीष भैय्या यांना दिले आहे.

blank