केंद्राच्या विरोधात काँग्रेसचा अमरावतीत ट्रक्टर मोर्चा,मंत्री यशोमतींनी चालविला ट्रक्टर

0
81

अमरावती,दि.05 : केंद्र सरकारकडून पारित केलेले शेतकरी विधेयक हे कामगार तसेच शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्यावतीने शहरात ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. या रॅलीत राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्रॅक्टर चालवून प्रशासनाचे लक्ष वेधले. मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत संपूर्ण शहर दणाणून सोडले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेसुद्धा करण्यात आली. ना. यशोमती ठाकूर , जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, माजी आमदार वीरेंद्र जगताप आदींनी या ट्रॅक्टर रॅलीचे नेतृत्व केले.