नागपूर शहर राँकाध्यक्ष पदावर अनिल देशमुख यांची निवड

0
16

मुंबई,दि.11- महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे झालेल्या बैठकित प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे ,विधिमंडळ पक्ष नेते आ.अजितदादा पवार ,माजी खासदार प्रफुल पटेल ,माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी अनिल देशमुख ,व नागपूर ग्रामीण अध्यक्ष पदी रमेश बंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रसंगी आमदार जयंत पाटील, मा.आ. दिलीप वळसे पाटील ,आमदार हेमंत टकले , आमदार जयदत्त क्षिरसागर ,सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते. देशमुख व बंग यांच्या निवड्डीबद्दल नागपूर शहरासह जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आनंद व्यक्त केला आहे.