जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय – ना. बडोले

0
9

पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयाचे शुभारंभ
गोंदिया,दि ११ : जिल्ह्यातील तळागाळातील जनतेच्या समस्या सुलभतेने सोडविण्याचा दृष्टीकोणातून व त्यांना वेळेवर न्याय मिळावा यासाठी जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मी स्वत: आठवड्यातील शनिवार, रविवार व सोमवारी २ वाजेपर्यंत कार्यालयात बसून नागरिकांच्या समस्या ऐकूण घेणार असून तातडीने त्यांचा निर्वाळा करण्यात येईल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
ते १० सप्टेंबर रोजी फुलचूर नाका येथे पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजय रहांगडाले, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जि.प. उपाध्यक्ष रचनाताई गहाणे, माजी आ. खुशाल बोपचे, माजी आ. हेमंत पटले, माजी आ. केशव मानकर, ज्येष्ठ नेते राधेश्याम अग्रवाल, जि. प. सभापती देवराम वळगाये, सभापती छाया दसरे, पं. स. सभापती दिलीप चौधरी, पं. स. सभापती अरविंद शिवणकर, अशोक इंगळे, विरेंद्र अंजनकर, दीपक कदम, शहर अध्यक्ष भरत क्षत्रीय, ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदकुमार बिसेन, तालुका अध्यक्ष येशुलाल उपराडे, शामराव शिवणकर, रघुनाथ लांजेवार, लक्ष्मण भगत, प्रमोद संगीडवार, माजी जि. प. सभापती कुसन घासले, प्रकाश गहाणे, सविता पुराम, उमाकांत ढेंगे, श्रावण राणा, जि. प. सदस्य शोभेलाल कटरे, विश्वजित डोंगरे, शैलजा सोनवाने, कमलेश्वरी लिल्हारे, शामकला पाचे, नगरसेवक शिव शर्मा, बंटी पंचबुद्धे, रेखलाल टेंभरे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते फित कापून विधिवत कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी माजी आ. खुशाल बोपचे, माजी आ. केशव मानकर, माजी आ. हेमंत पटले, ज्येष्ठ नेते डॉ. राधेश्याम अग्रवाल, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जि. प. उपाध्यक्ष रचना गहाणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शहर महामंत्री संजय मुरकुटे, अमित झा, बाबा बिसेन, सुनिल केलनका, किशोर हालानी, महेश आहुजा, पंकज सोनवाने, पुष्पराज जनबंधू, महेंद्र मेश्राम, राजेश रामटेके, पप्पू अटरे, मार्कंडराव ब्राम्हणकर, मुनेश रहांगडाले, ज्ञानचंद जमईवार, पन्ना मचाडे, शालिनी डोंगरे, बाबुलाल पंचभाई, अभय अग्रवाल, कुशल अग्रवाल, ऋषीपाल टेंभरे, धनंजय रिनाइत, बरकत अली, रमेश साखरे, अशोक देशमुख, राजू ब्राम्हणकर आदी कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन भाजपचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख जयंत शुक्ला यांनी तर आभार शहर अध्यक्ष भरत क्षत्रीय यांनी मानले.