आमदार कोरोटेच्या कार्याने काँग्रेसला अच्छे दिन

0
68

#विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी पक्षप्रवेशाला वेग

देवरी,दि.19ः- आमगाव देवरी विधानसभेचे आमदार सहसराम कोरोटे यांनी विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कार्यात सोबतच पक्षबांधणी साठी कंबर कसली आहे. विधानसभा क्षेत्रातील विविध क्षेत्रात पक्ष प्रवेश करुन काँग्रेस पक्षाला अच्छे दिन प्राप्त करून दिले आहेत. विधानसभेत एकूण तीन तालुक्यांचा समावेश होत असून क्षेत्रफळाने बरेच पसरलेले आहे, यातच सर्वाधिक ग्रामीण आणि शेतकरी वर्गातील नागरिकांच्या समावेश होत असून देवरी येथील एकमेव एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र सोडले तर संपूर्ण विधानसभा ही शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहे. त्यामुळे आमदार सहसराम कोरोटे यांनी शेती आणि शेतीपूरक व्यवसायांकडे लक्ष घालून शेतकऱ्यांना शेतीतूनच अधिक लाभ मिळवण्यासाठी भर देत कार्याची सुरुवात केली आहे. धानाचे चुकारे आणि उर्वरित बोनस रक्कम तत्काळ शेतकऱ्यांना सुपूर्त करण्यासाठीही आमदार सहसराम खरोटे यांनी मंत्रालयात प्रयत्न केले आहे. याशिवाय विविध ठिकाणी रस्ते, नाली, समाज भवन बांधकाम अशा विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करून नागरिकांचे आणि कार्यकर्त्यांचे समन्वय साधला आहे. विविध पक्षातून कार्यकर्ते आमदार सहसराम कोरोटे यांच्या नेतृत्वाला स्वीकारून काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नुकताच सालेकसा येथील कार्यकर्ता मेळाव्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केले. तसेच आमगाव आणि देवरी तालुक्यातील विविध ग्रामीण क्षेत्रात भाजप पक्षातून कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केले आहे. सर्वाधिक ग्रामीण क्षेत्रातून काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू असल्याने काँग्रेसला सुगीचे दिवस आल्याचे चित्र दिसून येत आहे. सहसराम कोरोटे यांनी विधानसभेचे सदस्यत्व स्वीकारल्यापासून कोरोना काळातील संचार बंदी मुळे विविध विकास कामांना अडथळे निर्माण झाले होते, परंतु सध्या विविध ठिकाणी सुरू असलेल्या भूमिपूजन आणि उद्घाटन समारोह यांना बघून ग्रामीण क्षेत्रातील जनतेला आमदार सहसराम कोरोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास बसत असल्याचे चित्र एकंदर दिसून येत आहे. यातूनच काँग्रेस पक्षाला ही मोठ्या प्रमाणात लाभ झाले असून ग्रामीण क्षेत्रात पक्षप्रवेश कार्यक्रमाची होळ लागलेली आहे.

विरोधकांनी आमदार कोरोटे यांच्यावर विविध आरोप करून यांची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्नही केले परंतु जनता खरं आणि खोटं यातलं फरक योग्य पद्धतीने करत असते आणि त्याचं चित्र आज विविध पक्षप्रवेश सोहळ्यातून दिसून येत आहे, असे विधान आमदार कोरोटे यांनी पक्ष प्रवेश सोहळा दरम्यान व्यक्त केले.