30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय सेलोटपार येथील ग्रा.पं. सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश

सेलोटपार येथील ग्रा.पं. सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
54

blank

तिरोडा, दि.21 : तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या कार्यावर विश्वास ठेवून ग्रामपंचायत सेलोटपार येथील ग्रा.पं. सदस्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामधून भाजपमध्ये प्रवेश घेतला.यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत सदस्य शशीकला हलमारे, कार्यकर्ते दुर्गाप्रसाद हलमारे, जगदीश हलमारे, अविनाश ठवकर, दीपक पंचबुद्धे, चांगेश्वर शेंडे, अमोल शेंडे, अनिल मेश्राम यांचा समावेश आहे.भाजप प्रवेशादरम्यान आमदार विजय रहांगडाले, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, कृउबास सभापती डॉ.चिंतामण रहांगडाले, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाला वहिले, कृउबास संचालक जितेंद्र रहांगडाले, युवा मोर्चा सचिव सुनील भोयर, मुरमाडी सरपंच गजानन पारधी, संतोष बावनकर उपस्थित होते.

blank