अभिनेत्री पायल रोहतगीवर कठोर कारवाई करा

0
33

चंद्रपूर-बिग बॉस फ्रेम आणि तथाकथित अभिनेत्री पायल रोहतोगीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित केला. सध्या तो व्हिडीओ मोठय़ा प्रमाणात वायरल होत आहे. त्यात या नटीने कुठल्याही पुराव्याशिवाय महात्मा गांधी, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह संपूर्ण गांधी कुटुंबाची बदनामी करणारा तथ्यहीन व्हिडीओ प्रसारित केला आहे. या व्हिडीओमुळे सामाजिक, राजकीय आणि धार्मिक तेढ निर्माण होण्याची भीती असल्याने अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गुरुवारी प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी पत्रकार परिषदेत केली. या संबंधित तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या कडे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कडून करण्यात आली आहे.
भारताच्या स्वातंत्र्य लढय़ात आणि देशाच्या जडणघडणीत राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचे मोठे योगदान आहे. महात्मा गांधी आणि इंदिरा गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले, असे असताना अभिनेत्री पायल रोहतगी हिने बदनामीकारक व्हिडीओ प्रसारित करून लोकांच्या मनात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. विषय केवळ पायल रोहतगी हा नसून जेव्हाजेव्हा काँग्रेस पक्ष जन सामान्यांच्या मुद्यांना हात घालते तेव्हातेव्हा ट्रोललर गांधी घराण्याचा अपप्रचार सुरू करतात. महागाईने संपूर्ण देशातील जनता त्रस्त आणि संतापात असताना जाणीवपूर्वक रोहतगीसारखे ट्रोलर्स असे व्हिडीओ वायरल करून लोकांचे लक्ष मुख्य मुद्यावरून विचलित करण्याचा प्रयत्न करतात. नुकतीच घरघुती गॅस सिलिंडरमध्ये २५ रुपयांची वाढ झाली. आता सगळीकडे हिच चर्चा सुरू असताना असे व्हिडीओ ट्रोलर्सकडून जाणीवपूर्वक वायरल केले जात आहे.
पत्रकार परिषदेला जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्षा सुनीता धोटे, शीतल काटकर, जिल्हा सेवादल महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती त्रिवेदी, शहर अध्यक्षा लता बारापात्रे, अनुसूचित विभागाच्या महिला जिल्हाध्यक्षा अनु दहेगावकर, शहर अध्यक्षा शालिनी भगत, मंगला शिवरकर उपस्थित होते