ग्रामविकास अधिकारी विना गावविकासाची कामे रखडली

0
57

महागाव ग्रामपंचायतीतील प्रकार

अर्जुनी मोर-तालुक्यातील महागाव ग्रामपंचायतीमधे ग्रामविकास अधिकारी नसल्याने गावविकासासह ग्रामस्थांची कामे रखडली आहेत. महागाव ग्रापंमध्ये कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देण्याची मागणी महागांवचे सरपंचासह भाजपाचे वरीष्ठ नेते रामदास कोहाडकर यांनी केली आहे.
अर्जुनी मोर तालुकास्थळापासुन 15 किमी अंतरावरील महागाव ग्रापं 13 सदस्यीय आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार गावची लोकसंख्या 5496 तर कुटुंबसंख्या 1308 आहे. तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्व प्राप्त असलेल्या या ग्रामपंचायतीवर भाजपा समर्थित गटाचे वर्चस्व आहे. लोकसंख्येनुसार महागाव ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारी पद मुजूर आहे. येथील ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी म्हणून हरडे कार्यरत होते. नोव्हेंबर 2020 हरडे निलंबित झाले. त्यानंतर विनोद श्रीवास्तव यांच्याकडे महागाव ग्रापंचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला. मात्र श्रीवास्तव यांनी कोविडच्या कामात निष्काळजीपणा केल्याने तेही जून महिन्यात निलंबित झाले. तेव्हा पासून महागाव ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी नाही. गावची मिनीमंत्रालय असलेल्या महागाव ग्रामपंचायत सचिवाविनाच आहे. त्यामुळे गावविकासासह ग्रामस्थांची कामे थांबली आहेत. गावविकासाला गती येण्यासाठी महागाव ग्रापंमध्ये तत्काळ ग्रामविकास अधिकार्‍याची नेमणूक करावी, असी मागणी ग्रापं पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी केली आहे.
महागाव ग्रामपंचायतीचा प्रभार ग्रामसेवक हातझाडे यांच्याकडे देेण्यात आला आहे. ग्रामसेवकाच्या आंदोलनामुळे हातझाडे यांना रुजु होण्यास विलंब झाला, लवकरच ते रुजु होणर असल्याचे गटविकास अधिकारी निमजे यांनी सांगीतले.