शिक्षकांच्या मागण्यांसाठी भाजपा शिक्षक आघाडीचे धरणे आंदोलन

0
34
–  शिक्षणाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
गोंदिया, 9 सप्टेंबर–महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनश्ाून्य कारभारा विरोधात भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीच्या वतीने शिक्षकांच्या समर्थनार्थ 8 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. येथील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनानुसार, महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे शिक्षण क्षेत्रात अनागोंदी निर्माण झाली आहे. शिक्षण क्षेत्रात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा शिक्षक आघाडीने शासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही शासनाने शिक्षकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने शिक्षक आघाडीने शिक्षकांच्या मागण्या निकाली काढण्यासंदर्भात आक्रमक भुमीका घेतली आहे. आज, भाजपा शिक्षक आघाडी जिल्हा शाखेतर्फे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करुन शिक्षणाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व संबंधितांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना भाजपा जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर, माजी आ.हेमंत पटले, शिक्षक आघाडीचे प्रदेश सदस्य अरुण पारधी, भाजपा जिल्हा महामंत्री संजय कुळकर्णी, ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनलाल ठाकरे, ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री गजेंद्र फुंडे, मनोज मेंढे, लिलेश्वर बोरकर, चरणदास आंधळे, चरणदास डहारे, मनोज येळे, सतीश मंत्री, मधुकर कुळसुंगे, डी.एम. राऊत, सुरेश परशुरामकर, बी. बी. बिसेन आदी उपस्थित होेते.