पालडोंगरी येथे पोषण महिना कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन शिबिर उत्साहात

0
19

तिरोडा,दि.10ः- केंद्र सरकारच्यावतीने राष्ट्रीय पोषण महिना 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण देशात राबविण्यात येत असून अंगणवाडी केंद्र पालडोंगरी बीट इंदोरा प्रकल्प तिरोडा येथे राष्ट्रीय पोषण दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी स्तनदा माता, गरोदर माता, किशोरवयीन मुली व 0 ते 6 वयोगटातील बालकांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच SAM बालकांचेVCDCचे आयोजन करण्याबाबत ठरविण्यात आले.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय गणवीर,बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोदकुमार चौधरी,स्त्री व बाल रोग तज्ञ डॉ.नीरज गुप्ता यांनी सर्व लाभार्थ्यांना पोषण महिन्याचे महत्त्व पटवून दिले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत पालडोंगरीचे सरपंच चंद्रकुमार चौधरी होते.प्रमुख अतिथी उपसरपंच विनोद उके, सदस्य चँदंकात साबडे, दिलिप राहागंडाले व रिना भास्कर, उपकेंद्राचे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर विनोद जाधव,विस्तार अधिकारी साजन दादूरिया, गट समन्वयक तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका व समस्त गावकरी या कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन इंदोरा बिटच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती पुष्पा रोही यांनी केले तर आभार अंगणवाडी सेविका श्रीमती कटरे यांनी मानले.यशस्वीतेसाठी पालडोंगरी येथील अंगणवाडी सेविका मीनाक्षी पटले,श्रीमती कटरे व मदतनीस श्रीमती पटले यांनी अथक परिश्रम घेतले.