केतन तुरकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष

0
45

गोंदियाः- राष्ट्रवादी कांग्रेस भवन येथे झालेल्या राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्या सभेत केतन तुरकर यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियु्नती करण्यात आली. खासदार प्रफुल पटेल यांच्या आदेशाने व मा. राजेन्द्र जैन यांचा मार्गदर्शनाने ही नियु्नती करण्यात आली. राष्ट्रवादी कांग्रेस भवन येथे राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, माजी आमदार राजेन्द्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांच्या हस्ते केतन तुरकर यांना राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियु्नती पत्र देण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे,नागपूरचे प्रभारी सौरभ मिश्रा,नागपूर जिल्हाध्यक्ष शैलेन्द्र तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी तुरकर यांना अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्यानंतर लोकपाल गहाणे, विनायक शर्मा, दिनेश कोरे, नितिन टेभरें, रविकुमार पटले, नीरज उपवंशी, आर.दि अग्रवाल, इम्रान शेख, रंजित टेभरें, दिलप्रितसिंग वोरा, रोहित पटले, माधुरी सहारे, श्रुती कावळे, स्वाती दमाहे, सायमा खान, रुपाली रोटकर, सौरभ रोकडे, एकनाथ वाहिले, चेतन कुंभारे, चाहत मेश्राम, आकाश नागपुरे, नियाज शेख, त्रिलोक तुरकर,संकेत पटले, विजय कोल्हे यांनी अभिनंदन केले.