युरियाचा काळाबाजार करणाऱ्यांना बेड्या ठोका

0
74

सामाजिक कार्यकर्ते प्रितम मेश्राम यांची मागणी

गोंदिया(ता.14)सध्या शेतीचा हंगाम सुरू असून या वेळेस धान शेतीला युरिया खताची अत्यंत आवश्यकता आहे. आणि ते जर धान शेतीला वेळेवर मिळाले नाही तर ऐन बहरात आलेले धान पिक मातीमोल होण्याची शक्यता आहे. हिच संधी साधून खत व्यापाऱ्यांनी कृत्रिमरीत्या युरिया खताचा तुटवडा निर्माण करून काळा बाजार मांडला आहे. युरिया खताचा काळा बाजार करणार्यांना सरळ बेड्याच ठोका अशी मागणी ढाकनी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रितम मेश्राम यांनी केली आहे.
आपला जिल्हा हा धान शेतीचा जिल्हा आहे. या धान शेतीवरच येथील शेतकऱ्यांचे जीवन आहे. सध्या धान शेतीला करपा रोगाने ग्रासले असून त्याचा निदान म्हणून युरिया खताची आवश्यकता आहे. आणि ते खरेदीसाठी शेतकरी बंधू एकच धावपळ करीत आहेत. हिच संधी साधून खत व्यापारी कृत्रिमरित्या युरिया खताचा तुटवडा दाखवून दोनशे सत्तर रुपयाची गोणी सरळ पाचशे रुपयाला विक्री करीत आहेत. हि सर्व माहिती कृषी विभागाला व जिल्हा प्रशासनाला शुद्धा आहे. खताच्या होणाऱ्या काळ्याबाजारवर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागाकडून उड्डनदस्ते शुध्दा बनविन्यात आले.परंतु आजपर्यंत या उड्डाणदस्त्यांनी खत व्यापार्यांना फक्त नोटिसाच दिल्या असून ठोक स्वरूपाची कारवाही केली नाही. त्यामुळे कृषी विभाग हा शेतकरी हिताचा कि खत विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या हिताचा असा प्रन्न जिल्हयातील शेतकऱ्यांना पडणे स्वाभाविक आहे. युरिया खताची कोणतीही टंचाही नाही असे कृषी विभागाचे म्हणने आहे तर मग युरिया चा तुटवडा कसा?असा प्रन्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याच्या उत्पन्नावरच देश्याची अर्थव्यवस्था चालतो.असे असले तरी सद्य स्थितीत वाढलेल्या खतांच्या किमतीमुळे शेतकरी वर्ग आर्थिक तंगीत सापडले आहेत.त्यातच उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. आशा परिस्थितही खत विक्रेते शेतकऱ्याच्या टाळूवरचे लोणी काढून त्याला ओरबडून काढत आहेत.ही अन्नदात्या साठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. तेंव्हा त्याला कोंडीत पकडून खताचा काळाबाजार मांडणाऱ्या खत व्यापाऱ्यांवर देशद्रोह कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना तात्काळ बेड्या ठोकन्यात याव्यात तसेच या काळाबाजार प्रकरणी कृषी अधिकाऱ्यावर ही गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी देखील प्रितम मेश्राम यांनी केली आहे.