विधान परिषदेच्या ८ जागांसाठी निवडणूक २७ डिसेंबरला

0
6

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या आठ जागांसाठी २७ डिसेंबरला मतदान होणार आहे. निकाल ३० डिसेंबरला जाहीर होईल.

या आठ जागांपैकी भाजपाकडे एकही जागा नाही. ४ जागा काँगे्रस, २ शिवसेनेकडे, १ राष्ट्रवादीकडे तर १ राष्ट्रवादी समर्थक अपक्षाकडे आहे.

अकोला-बुलडाणा-वाशिम, नागपूर, अहमदनगर, मुंबई-२, धुळे-नंदुरबार, कोल्हापूर आणि सोलापूर या त्या आठ जागा आहेत. गोपीकिसन बाजोरिया ( अकोला-बुलडाणा-वाशिम – शिवसेना), राजेंद्र मुळक (नागपूर-काँग्रेस), रामदास कदम ( मुंबई- शिवसेना), भाई जगताप (मुंबई-काँग्रेस), अमरिश पटेल (धुळे-नंदुरबार-काँग्रेस), महादेवराव महाडिक (कोल्हापूर-काँग्रेस), दीपक साळुंखे (सोलापूर-राष्ट्रवादी), अरुणकाका जगताप (अहमदनगर-अपक्ष) हे विद्यमान आमदार आहेत.२७ डिसेंबरच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची सुरुवात २ डिसेंबरला होईल. १० डिसेंबरला अर्जांची छाननी होईल. १२ डिसेंबरला अर्ज मागे घेण्याचा दिवस असेल.