आरोग्य विज्ञान विद्यापीठाला मुंडेंचे नाव द्या : शिक्षक परिषदेची मागणी

0
11

मुंंबई : दि.२५-महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याची मागणी शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. मुंडे यांच्या जयंतीनिमित्त १२ डिसेंबरला ही घोषणा करावी, अशी मागणी परिषदेने केली आहे.

विद्यापीठाचे नामकरण ‘लोकनेते कै. गोपीनाथ मुंडे आरोग्य विज्ञान विद्यापीठ’ असे करावे, अशी मागणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी केली आहे. हा प्रस्ताव ३१ आॅगस्ट २०१५ ला विद्यापीठास पाठविण्यात आला होता. विद्यापीठाच्या २८ आॅक्टोबरला झालेल्या बैठकीत शासन जो निर्णय घेईल, त्यास मान्यता असल्याचे सांगत ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे शासनाने तातडीने हा निर्णय घ्यावा, अशी मागणीही मोते यांनी केली आहे.