स्वतःला दलित म्हणणे सोडा म्हणजे अशी वेळ येणार नाही. :- डॉ. राजन माकणीकर

0
24

मुंबई दि.17:- (प्रतिनिधी) स्वतःला दलित संबोधणे सोडा म्हणजे अशी दयनीय अवस्था होणार नाही अशी समज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव् डॉ. राजन माकणीकर यांनी लातूर भाजपा खासदार शृंगारे यांना प्रसार माध्यमा द्वारे दिली.

लातूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 फुटी पुतळ्याचे आणावरण प्रसंगी खासदार सुधाकर श्रुगारे यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले की मी दलित असल्या कारणाने मला कुठल्या कार्यक्रमाला बोलावले जात नाही तर शासकीय कार्यलयातील अधिकारी माझं ऐकत नाहीत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले वा माजी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष व्यथा व्यक्त केली.

आरटीआय ऍक्टिव्हिस्ट डॉ. माकणीकर पुढे म्हणाले की,खासदार साहेब आपण संविधानिक पदावर आहात, 6,57,590 मताधिक्क्याने निवडून आलात, 10 लाखाच्या वर जनतेचे प्रतिनिधी आहात. तुमची अशी अवस्था असेल तर् मग सर्व सामान्याची काय अवस्था असेल ? तुम्ही स्वतःला दलित म्हणणे सोडा म्हणजे अशी दलिंदर परिस्तिथि ओढावणार नाही. स्वतःची अस्मिता जपा. संविधानाचे रक्षण करा. आंबेडकरी भारतीय समाजाचे तारक व्हा. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मारक बनू नका.

आरएसएस प्रणित भाजपा पक्षात राहून तुम्ही या जन्मात तरी स्वाभिमान बाळगू शकणार नाहीत. त्यामुळे भाजपा सोडून रिपाइ डेमोक्रॅटिक पक्षात प्रवेश घेऊन आंबेडकरी सत्ता स्थापन करण्याच्या मोहिमेत व्हावे व्हा. वा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राहिलेले अपूर्ण स्वप्न पूर्ण करावे असे जाहीर निमंत्रण वजा सल्ला ही विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी खासदार शृंगारे यांना दिला.