देवरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न

0
43

देवरी,दि.27 :- देवरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक आज (दि 27) देवरी येथे आयोजित करण्यात आली होती.

वैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर हे होते. या बैठकीस माजी म्हाडा अध्यक्ष नरेश माहेश्वरी, आमगाव-देवरी विधानसभा अध्यक्ष रमेश ताराम, तालु अध्यक्ष सी. के. बिसेन, तालुका सचिव सुजित अग्रवाल यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे देवरी तालुकाध्यक्ष सी. के. बिसेन यांनी केले. या बैठकीत पक्ष सदस्य नोंदणी अभियान, व आगामी काळातील ग्रामंपचायत निवडणूक, पक्ष वाढीव करण्या याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्ष गंगाधर परशुराम, नरेश माहेश्वरी, रमेश ताराम यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन तालुक्यात सदस्य नोंदणी अधिक प्रमाणात करून तालुक्यातील पक्ष संघटन वाढवावे. आगामी काळातील निवडणुका सक्षमपणे लढवाव्यात अशा सूचना केल्या

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गोपालजी तिवारी, भैय्यालाल चांदेवार, दिलीप द्रुपकर, मुकेश खरोले, मनोहर राऊत, पंकज शहारे, विलास चाकाटे, बबलु भाटीया, महिला तालुका अध्यक्षा पार्बताबाई चांदेवार, मंजुषा वासनीक, शर्मीला टेंभुर्णिकर, पुष्पा मस्के, लक्षी मेश्राम, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.   सूत्रसंचालन मनोहर राऊत यांनी केले व आभार सुजित अग्रवाल यांनीं मानले.