गोरेगाव व तिरोडा पंचायत समितीवर आ.रहागंडालेच्या नेतृत्वात भाजपची सत्ता

0
162

तिरोडा/गोरेगाव,दि.06: तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ राहांगडाले यांच्या नेतृत्वात गोरेगाव व तिरोडा पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवली असून तिरोडा पंचायत समिती सभापतीपदी कुंता रामप्रकाश पटले व उपसभापतीपदी हुपराज रामजी जमईवार तसेच गोरेगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी इंजि.मनोज शामलाल बोपचे व उपसभापती पदी राजकुमार रामविलास यादव यांची बिनविरोध निवड झाली.तिरोडा आणि गोरेगाव दोन्ही पंचायत समितीवर भाजपने झेंडा फडकवला.

संपूर्ण तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रात आमदार विजय रहांगडाले यांच्या कार्य करण्याच्या शैलीवर जनतेने विश्वास ठेवत भाजपाच्या उम्मेदवारांना विजयी केले.दोन्ही पंचायत समितीमध्ये झालेल्या सभापती पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आमदार विजय रहांगडाले,तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे,डाॅ.साहेबलाल कटरे व पक्ष पदाधिकारी यांचे आभार मानले.