सडक अर्जुनी पंचायत समितीवर भाजपची सत्ता,सभापतीपदी संगीता खोब्रागडे

0
60

सडक अर्जुनी-दि.6 मे – सडक अर्जुनी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदाकरीता आज झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सौ.संगीता खोब्रागडे सभापती तर शालीदंर कापगते यांची उपसभापदी पदावर बिनविरोध निवड झाली. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने ही निवडणुक बिनविरोध पार पडली.निवडणुक अधिकारी तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनी निवडणुकीची प्रकिया पार पाडली.निवडणुकीनंतर सभापतींनी पदग्रहण केले,त्याप्रसंगी उपस्थित भाजप नेत्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.यावेळी भाजप तालुका अध्यक्ष अशोक लंजे,‍जीवन लंजे, लक्ष्मीकांत धांनगाये, हर्ष मोदी, माजी जि.प.सदस्य मिलन राऊत,पंचायत समिती सदस्य चेतन वडगाये,विलास बागडकर, गौरेश बावनकर, सुनील भिवगडे, पदमा परतेकी, तथा भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.