40.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय देवरी पंचायत समितीवर भाजपचा झेंडा

देवरी पंचायत समितीवर भाजपचा झेंडा

0
219

blank

देवरी,दि.06 –देवरी पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत सभापतीपदी सौ.अंबिका बंजार तर उपसभापतीपदी अनिल बिसेन यांची निवड झाली.देवरी पंचायत समितीच्या एकूण १० जागांसाठी निवडणूक झाली होती. यापैकी ६ जागांवर भाजपने विजय प्राप्त करीत सत्तेच स्पष्ट बहुमत मिळविले आहे. तर काँग्रेसला ४ जागांवर समाधानी व्हावे लागले. या पंचायत समितीमध्ये राकाँला खातेही उघडता आले नव्हते.

blank