मंगळवारी देवरी येथे काँग्रेस पक्षाद्वारे जन आक्रोश शेतकरी मोर्चा

0
33

देवरी, ता.30: केंद्र सरकार द्वारे सतत वाढणारे इंधनाचे व दैनंदिनी जीवनावश्यक वस्तूचे दर आणि आदिवासी संस्थेवर प्रति शेतकरी फक्त १६ क्विंटल होणारी धान खरेदी या विषयावर देवरी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने येत्या मंगळवारी( ता.३१ मे) रोजी देवरी येथील वनविभागाच्या तपासणी नाका परसटोला वरून उपविभागीय अधिकारी कार्यालय वर जन आक्रोश शेतकरी मोर्च्याचे आयोजन सकाळी ११ वाजता कण्यात आले आहे.
या मोर्च्यांचे नेतृत्व या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे हे करणार आहेत. तरी या मोर्च्यात शेतकरी व सर्वसामान्य लोकांनी आपआपल्या वाहनांनी व ट्रॅक्टर घेऊन जास्तीत जास्तीत संख्येत उपस्थित राहून या मोर्च्यात सहभाग घ्यावा असे आवाहन काँग्रेस चे देवरी तालुकाध्यक्ष संदीप भाटिया यांनी केले आहे.