32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय तिरोडा शहरात भाजयुमो तर्फे” विकास तीर्थ” बाइक रैली

तिरोडा शहरात भाजयुमो तर्फे” विकास तीर्थ” बाइक रैली

0
36

blank

तिरोडा,दि.15ः- भारतीय जनता युवा मोर्चा गोंदिया जिल्हाच्या वतीने तिरोडा तालुक्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या “8 साल बेमिसाल” पूर्ण झाल्याबद्दल बाइक रैलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते.ज्याप्रमाणे मोदी सरकार 8 वर्षामध्ये लोकहित,गरीब कल्याणकारी योजना,शेतकरी सन्मान,महिलांकरिता उज्वला गँस योजना,मुद्रा कर्ज योजना, कोरोना वैक्सीन वितरण, 80 कोटी जनतेला मोफत अन्न वाटप योजना,सिमा सुरक्षा मध्ये भारताचे जागतिक क्षेत्रात दबदबा हे पूर्ण कार्य मोदीजीच्या सक्षम नेतृत्वात होत आहे. याचा प्रचार म्हणून युवा मोर्चा तर्फे बाइक रैलीचे आयोजन करण्यात आले होते.यात प्रामुख्याने तिरोडा गोरेगांव क्षेत्रचे आमदार विजयभाऊ राहंगडाले, भाजयूमोचे जिल्हाध्यक्ष ओम कटरे, तालुका अध्यक्ष भाऊराव कठाने, पंचायत समिति सभापति कुंताताई पटले,उपसभापति हुपराज जमईवार ,शहर अध्यक्ष स्वानंद पारधी, युवा मोर्चा अध्यक्ष बाला वहिले, अमोल तितरमारे,वरिष्ठ कार्यकर्ता अनुप बोपचे, महिला शहर अध्यक्ष ,राणी बालकोठे,पस सदस्य तेजराम चव्हाण टेम्भेकर, भलाई ताई, डॉ चेतलाल भगत, सुनन्दा ताई पटले,डीलेश पारधी,शीतल टिवडे,डॉ अनंत पटले, यस्मित बिसेन ,वैभव पटले, विक्की जगने, हस्तराज पारधी,नंदकिशोर राहंगडाले, प्रकाश सोनकावड़े,दिगम्बर ढोक,रजत वाल्मीक , मकरंद लिल्हारे,नितिन पराते, नागेश तरारे,अरविंद काम्बली, आणि मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

blank