खासदार मेंढे यांच्या कार्य पुस्तिकेचे उपमुख्यमंत्र्यांनी केले विमोचन

0
36

भंडारा,दि..03ः लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो. मालक जनतेला कामाचा लेखाजोखा देणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधींचे काम आहे. खासदार सुनील मेंढे यांच्या कार्य पुस्तिकेचे प्रकाशन म्हणजे मतदारांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भंडारा जिल्हाचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे यांच्या नगराध्यक्ष आणि खासदार म्हणून केलेल्या कार्याचा आढावा घेणाऱ्या पुस्तिकेचे विमोचन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.ते यानिमित्ताने भाजप कार्यकर्तामेळाव्याचे आयोजन ही करण्यात
आले होते.यावेळी व्यासपीठावर खा.सुनील मेंढे यांच्यासह आ. परीणय फुके, आ. नरेंद्र भोंडेकर,संजय भेंडे,माजी खासदार शिशुपाल पटले,माजी आ. बाळा काशिवार,रामचंद्र अवसरे,हेमकृष्ण कापगते,वीरेंद्र अंजनकर,भाजपा जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे,प्रशांत खोब्रागडे,प्रदीप पडोळे,संजय कुंभलकर, विनोद बांते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.