आमदार वैभव नाईक यांच्या चौकशीच्या निषेधार्थ शिवसेनेचा कुडाळात उद्या मंगळवार भव्य मोर्चा

0
16
वाढदिवसाच्या शुभेच्छा

कुडाळ:-आमदार वैभव नाईक यांच्यावर झालेल्या चौकशीच्या कार्यवाहीचे निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने भव्य मोर्चा मंगळवार दि.१८ ऑक्टोंबर रोजी कुडाळच्या लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयावर काढण्यात येणार आहे.या मोर्चात शिवसेनिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनेचे कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी केले आहे.

काही दिवसापूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून चुकीच्या पद्धतीने चौकशी सत्ताधारी शासनाच्या सूडबुद्धीने दबावतंत्राचा वापर करून करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्य शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने मंगळवार दि.१८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता खासदार अरविंद सावंत,आमदार भास्कर जाधव, संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, गौरीशंकर खोत, यांचे नेतृत्वाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कुडाळ येथील कार्यालयावर कुडाळ शिवसेना कार्यालय ते एस आर एम कॉलेज सर्कल मार्गे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय कुडाळ असा जाहीर निषेध मोर्चा घेऊन जाणार आहोत, महिला बालरुग्णालय कुडाळ नजीक असलेल्या कॉर्नरवर उपस्थित मान्यवर हे मोर्चाला संबोधित करणार आहेत. तरी कुडाळ तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाप्रमुख श्री राजन नाईक यांनी केले आहे.