पुर्व विदर्भातून आ.बड़ोले व आ.राजेअंबरीशराव मंत्री होणार

0
15

गोंदिया-महाराष्ट्र राज्याच्या उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळातील विस्तारात भारतीय जनता पार्टीचे गोंदिया जिल्ह्यातून दुसर्यांदा निवडून आलेले अजुर्नी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार इंजि.राजकुमार बडोले यांची मंत्रीपदावर वर्णी लागण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.तसेच अहेरी विधान सभेचे युवा तडफदार आमदार मा राजे अंबरीशराव महाराज यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची अत्यंत दाट शक्यता आहे. उच्चस्तरीय सूत्रांकडून माहितीनुसार आमदार बडोले हे आज गुरुवारी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यावतीने आयोजित कृषी प्रदशर्नात हजर होते.तिथे त्यांनी गडकरी यांचीही भेट घेतली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अथर्मत्री सुधीर मुनगंटीवार यांचीही भेट घेतली.शुक्रवारी सकाळी आमदार बडोले विमानाने मुबईसाठी रवाना होणार आहेत.त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल जाणार आहेत.बडोले व अंबरिशराव यांचे मंत्रीपद निश्चित होताच अजुर्नी मोरगाव व अहेरी विधानसभेत कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण.
याशिवाय शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद देण्यावरही भाजप-शिवसेनेत एकमत झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेले रिपाइं अध्यक्ष रामदास आठवलेंचे केंद्रात मंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण होत नसल्याने त्यांना राज्यात आणून लाल दिवा देण्याच्या हालचाली भाजपकडून सुरू आहेत. दिवाकर रावते यांना मंत्रिमंडळ विस्तारात कृषिमंत्रिपद, विद्यमान विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांना सार्वजनिक बांधकाम, सुभाष देसाई यांना गृहनिर्माण किंवा ऊर्जा, नीलम गो-हे यांचे नाव आरोग्य मंत्रालयासाठी निश्चित मानले जात आहे. शिवसेनेला राज्यात पाच कॅबिनेट, सात राज्यमंत्री तसेच विधानसभेत उपाध्यक्षपद देण्यावर दोन्ही पक्षांमध्ये मतैक्य झाले
मेटे, खोत महामंडळावर
केंद्रीय मंत्रिमंडळात रामदास आठवले यांचा समावेश करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साफ नकार दिला आहे. त्यामुळे आठवले यांना राज्यात परत येऊन कॅबिनेट मंत्रिपद स्वीकारण्याचा आग्रह भाजपने धरला आहे. यासाठी आठवले राजी झाले असल्याचे भाजपमधील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. महादेव जानकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याऐवजी त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांना मंत्रिमंडळात घेण्याचे भाजपने ठरवले आहे. जानकर,
विनायक मेटे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांना महत्त्वाच्या महामंडळांवर संधी देण्यात येणार आहे