इंजि. राजकुमार बडोले मित्र परिवारातर्फे अर्जुनी-मोर विधानसभा क्षेत्रातील नवनिर्वाचित सरपंच,सदस्याचा ०५ जानेवारीला सत्कार सोहळा

0
12

*आदर्श संरपच भास्करराव पेरे पाटील करणार संरपच,सदस्यांना मार्गदर्शन.*

सडक अर्जुनी: (०३ जानेवारी) इंजि.राजकुमार बडोले मित्र परिवाराच्या वतीने आशिर्वाद सभागृह सडक अर्जुनी येथे ०५ जानेवारी रोजी अर्जुनी-मोर विधानसभा क्षेत्रातील सर्व नवनिर्वाचित सरपंच,सदस्याचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या सत्कार सोहळ्याचे उद्घाटन भंडारा गोंदियाचे खासदार सुनिल मेंन्ढे यांच्या हस्ते होणार असुन भाजपचे विदर्भ संघटन मंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर यांच्या अध्यक्षतेत माजी मंत्री डॉ.परिणय फुके,आदर्श संरपच भास्करराव पेरे पाटील,भाजप जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर,प्रदेश उपाध्यक्ष हेमंत पटले,संजय भेंडे,संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर याच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

तरी सर्व नवनिर्वाचित संरपच,सदस्य,पदाधिकारी,कार्यकर्त्यांना उपस्थितीत राहण्याचे आवाहन इंजि.राजकुमार बडोले मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.